चंद्रपूर, गडचिरोलीत भूकंप

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी ८.४२ वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल

पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

भर उन्हाळयात गारपीट! आज, उद्या पावसाचा अंदाज

विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. तब्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *