Breaking News

तालुका कृषी अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Advertisements

नाशकातील सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि.२१) घडली.

Advertisements

महिनाभरात सहकार विभागातील दोन अधिकारी आणि त्यानंतर आता तालुका कृषी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

Advertisements

अण्णासाहेब हेमंत गागरे (42, रा. प्राइड ग्लोरी अपार्टेंट, नाशिक रोड, नाशिक) असे संशयित आरोपी तालुका कृषी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे निफाडचाही अतिरिक्त पदभार आहे.

तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसी या ठिकाणी शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित केले जाते. परंतु गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता ४ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २ लाख रुपये लाच घेण्याचे निश्चित केले. त्यातील लाचेचा पहिला हफ्ता ५० हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *