Breaking News

पतंजलीच्या ‘मंजन’मध्ये माशाच्या हाडाचा वापर : रामदेव बाबा अडचणीत?

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला दिल्लीतल्या एका लीगल फर्मने कायदेशीर नोटीस धाडली आहे. पतंजलीचं उत्पादन असलेल्या दिव्य दंतमंजन या दात घासण्याच्या पावडरवर व्हेज असल्याचं हिरवं लेबल आहे. मात्र या पावडरमध्ये माशाच्या हाडांची भुक्टी असल्याचा आरोप या नोटीसमध्ये आहे.

एका वृत्तपत्राने यावर बातमी दिली आहे. मांसाहारी घटक वापरुन दंत मंजन तयार करण्यात आलं आहे आणि त्यावर व्हेजचं लेबल लावण्यात आलं आहे. ग्रीन मार्क दिला गेला आहे असं म्हणत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे नोटीसमध्ये?

वकील शाशा जैन यांनी असंही म्हटलं आहे की माझ्या कुटुंबातले काही सदस्य, काही परिचयाचे लोक दिव्य दंतमंजन वापरताता. मात्र या दंत मंजनात Cuttlefish सारखे मांसाहारी घट वापरले आहेत. हे समजल्यानंतर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पतंजलीकडून याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता उत्पादनांवर विश्वास कसा ठेवायचा असंही त्यांनी विचारलं आहे.

शाशा जैन यांनी पतंजलीला जी नोटीस बजावली आहे त्यामध्ये पुढच्या १५ दिवसांमध्ये उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे. तसंच उत्तर दिलं नाही किंवा योग्य स्पष्टीकरण दिलं नाही तर आम्ही कायेदशीर कारवाई करु असाही इशारा दिला आहे.

About विश्व भारत

Check Also

मैद्यामुळे अनेक गंभीर आजार : मैद्याऐवजी कोणते पर्याय?

केक आणि ब्रेडपासून ते समोसा, वडापाव, सँण्डवीचपर्यंत अशा आपल्याला आवडणाऱ्या बहुतेक फास्ट फूडमध्ये मैदा वापरला …

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *