एका PHD डॉक्टरला खंडणी घेताना अटक करण्यात आली आहे. हा डॉक्टर रेती व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. 29 वर्षीय शुभम चांभारे असं आहे. रेती व्यावसायिकाचे नाव आहे. तर, डॉ. नरेंद्र दाते (PHD) असं आहे आरोपीचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एका वैध वाळूघाट चालकाला सामाजिक कार्यकर्ता असलेल्या पीएचडीप्राप्त डॉक्टरने धमकावत पैशाची मागणी केली.
परंतु या मागणीला भीक न घालता त्याने थेट पोलिसात धाव घेत त्याचे बिंग फोडले. 29 वर्षीय शुभम चांभारे मागील 4 ते 5 वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय करीत आहेत. परंतु त्याला लुटण्याचा प्रयत्न एका पीएचडप्राप्त डॉक्टरने सुरू केला.
सतत काही ना काही कारणावरून बड्या अधिकाऱ्याची धमकी देत तो वारंवार फोन करत असे. भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिठ भद्रावती येथील वाळू घाटावर जात फोटो काढत सुपरवायझर आशुतोष घाटे याला धमकविण्याचे प्रकार सुरू केले होते. मात्र वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वाळू चालकाने पोलिसांकडे मदत मागितली.