✍️मोहन कारेमोरे
देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचे बेकायदेशीर प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. असाच धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात घडला आहे. वरुड तालुक्यातील वघाळ या 1991 साली पुनर्वसन झालेल्या गावातील बालाजी देवस्थानाच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून ताब्यात घेण्याचा प्रकार समोर आलाय. बालाजी देवस्थान या नावाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी झालेली आहे. नोंदणी क्रमांक 477 असून कमीत कमी 7 ते 8 एकर शेतजमीन देवस्थानच्या नावावर आहे. त्या जमिनीवर अन्य गावातील गुंड प्रवृत्तीचे इसम आपला हक्क दाखवून बळकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतकेच नव्हे तर त्यावर पीक घेत आहेत.
नागरिकांचा आक्षेप,मात्र तहसीलदार सुस्त
हा प्रकार गैरकायदेशीर आहे, असा दावा देवस्थानचे अध्यक्ष सूर्यकांत लांगपुरे, सचिव रमेश वानखडे, बाकाभाऊ देशपांडे, हरेंद्र शेंडे, साहेबराव जावकेकर, नितीन आंजीकर, दिनेश शेगोळे, विठ्ठल पोहणे, धनराज विंचूरकर, सागर हरले, अनंत दळवी, पांडुरंग विंचूरकर, नामदेव वानखडे, मधुकर पोहणे, जानराव बावणे, अरुणपंत खांडेकर, मारोतराव खोपे, निलेश कावनपुरे, पंकज कावनपुरे, सुरेश चांदुरकर, सचिन कोहळे, नारायण वाघमारे, गुणवंत वानखडे, उमेश शेगोळे, प्रकाश कावनपुरे, पर्वेश पठाण, अजय खोपे, भारत वाघमारे, निलेश राऊत, आकाश हजारे, राजेंद्र पोहणे, हर्षल वानखडे, हरेश लष्करे, अनिल पोहणे, विशाल राऊत, प्रतापसिंग पवार, राहुल आंजीकर, विक्की आंजीकर, गोपाल पोहणे, सलमान पठाण, तैजीब काझी, जूनेदखा पठाण, जुबेरखा पठाण यांनी वरुड तहसीलदारांकडे मेला आहे. तरीही, अजून कारवाई झालेली नाही, असा दावा उपरोक्त गावकरी करतात.
लोकांना न्याय मिळवून देऊ-कारेमोरे
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नामवंत वकील मनोज मिश्रा यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधला. हे प्रकरण उघडकीस आणले आहे. प्रशासनाने न्याय न दिल्यास कोर्टाचा दरवाजा ठोठावला जाईल, असे मोहन कारेमोरे आणि वकील मनोज मिश्रा यांनी सांगितले.
विश्वभारत News Website