महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप : काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळणार?

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप काँग्रेसच्या एका गटामुळे अडकल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा गट भाजपसोबत येण्याच्या तयारीत असून तो आल्यानंतरच विस्तार आणि खातेवाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप बरोबर सहभागी झाला. त्यातील नऊ नेत्यांना मंत्रिपद मिळाले, पण अजूनही खातेवाटप झालेले नाहीये.

राष्ट्रवादीच्या सहभागामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अनेकांना मंत्रिपद मिळणे कठीण झाले आहे. हे नेते सध्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत आहेत. पण ‘मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त’ या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे.

काँग्रेसचा एक मोठा गट भाजपसोबत येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मुंबई आणि दिल्लीत हालचाली सुरू आहेत. हा गट सोबत आल्यास त्यांना तीन मंत्री पदे देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप रखडले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. या बैठकीत काँग्रेसला सोबत घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट आल्यास त्यांना काय द्यायचे? याबाबत गेले काही दिवस दिल्ली पातळीवर चर्चा सुरू आहे. मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

About विश्व भारत

Check Also

सुधीरभाऊंसाठी ‘लाडक्या बहिणी’ बनल्या रणरागिणी

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू …

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *