अजित पवारांच्या गटाकडून काही महत्त्वाची खाती मागण्यात आली आहे. ही खाते देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याचबरोबर शिंदेंच्या काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा केली जात होती. मात्र शिवसेनेकडून असं काहीही केले जाणार नसल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपचे सुरु असलेल्या आंदोलनाची हवा निघाली आहे.
भाजपच्या मनात काय?
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी आग्रही असून, दुसरीकडे भाजपची भूमिका मात्र वेगळी आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी भाजपची इच्छा आहे.
भाजपकडून काही मंत्र्यांना वगळण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र, यामुळे भाजपमध्ये असंतोष वाढण्याचीही शक्यता आहे.