Breaking News

गडचिरोलीच्या जंगलात दारू पार्टी : दोन कर्मचारी निलंबित

Advertisements

शासकीय नर्सरीत कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी करणे क्षेत्र सहायक व वनरक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. दारूची पार्टी करणाऱ्या बेडगाव वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्रसहायक आणि वनरक्षकाला देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी निलंबित केले. वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोलीतील कोरची तालुक्याअंतर्गत बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येते.

Advertisements

कार्यालयात कार्यरत असलेले क्षेत्र सहायक अजय गहाणे आणि वनरक्षक बबलू वाघाडे यांनी वन विभागाच्या मोहगाव येथील नर्सरीत कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी केली होती. दोघेही मद्यधुंद अवस्थेत कार्यरत होते. रोपवाटिकेत आलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी संबंधितांचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली होती.

Advertisements

दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन
कर्तव्यावर कसूर करून दारूच्या नशेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठांना करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दोषी अधिकाऱ्यांना १२ जुलै रोजी निलंबित केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिअरच्या दुकानासाठी घेतली एक लाखाची लाच : उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम …

100 ग्राम हैरोइन व 7 हजार ड्रग मनी सहित पकड़े गए मां-बेटे को जेल भेजा

100 ग्राम हैरोइन व 7 हजार ड्रग मनी सहित पकड़े गए मां-बेटे को जेल भेजा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *