Breaking News

शरद पवार दैवत असून ते विठ्ठलच!

शरद पवार हे आमचे दैवत असून ते विठ्ठलच आहेत, कोणी सांगितलं तरी आम्ही विठ्ठलाची भक्ती सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया सरचिटणीस सुरेश पाटील यांनी दिली आहे. धाराशिव हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आता जिल्ह्यातील जवळपास सर्वच पदाधिकारी अजित पवार गटात समील झाले आहेत. धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

धाराशिवमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार विक्रम काळे, राज्य सरचिटणीस सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, आणि आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातच विकास होणार, मात्र शरद पवार हे आमचे दैवत आहेत, त्यामुळे त्यांचे नाव व फोटो वापरणार अशी प्रतिक्रिया नुकतेच अजित पवार गटात दाखल झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यानं पुन्हा एकदा जावायालाच साथ दिली आहे. धाराशिवमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील आणि जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह धाराशिवमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केलं आहे.

About विश्व भारत

Check Also

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *