Breaking News

नागपुरात पाणीपुरी ठेल्यावर कारवाई : पाणीपुरी खाल्ल्यानं नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

नागपुरात काही दिवसांपूर्वी पाणीपुरी खाल्ल्याने एक तरुणीचा जीव गेल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता जाग आली असून अन्न व औषध प्रशासन विभागाची नागपूरात पाणीपुरी विक्रेत्यांवर छापे टाकले आहेत.

दूषित पाणीपुरी खाल्ल्यामुळे नागपुरात एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर एफडीए प्रशासन खडबडून जागं झालं. त्यांनी गेल्या दोन दिवसांत ५५ ठिकाणी पाणीपुरीच्या ठेल्यावर छापा टाकून कसून चौकशी आणि तपासणी केली.

एफडीएच्या छापेमारीत पाणीपुरी अस्वच्छतेत तयार होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आलं. अप्रॉन, हॅण्डग्लोव्ह्ज नसने, अशुद्ध पाण्याचा वापर, उघड्यावरचे खाद्यपदार्थ दिसल्यानंतर त्यांनी दोषी आढलेले दुकानदार आणि ठेलेवाल्यांवर कारवाई केली आहे.

छापेमारीनंतर 33 जणांवर कारवाई करत एफडीएने 99 हजार रुपयांचा दंड वसूल केला. अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

तुम्ही जर बाहेर खात असाल तर आता काळजी घ्या, नाहीतर अस्वच्छ असेल किंवा उघड्यावरचं खात असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतं जीवावर बेतू शकतं. विशेष म्हणाजे पाणीपुरी प्रेमींनी पाणीपुरी खाताना ही काळजी घ्यायला हवी.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। नोव्हेंबरमध्ये होणारी …

दो मुंह वाले सांप ने की प्रापर्टी डीलर से 68 लाख की ठगी

दो मुंह वाले सांप ने की प्रापर्टी डीलर से 68 लाख की ठगी टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *