Breaking News

बोगस कागदपत्रे बनवून शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन हडपली : मंत्र्याचा समावेश!

Advertisements

देशातील प्रसिद्ध लोढा बिल्डरने बोगस कागदपत्रे बनवून कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱयांची शेकडो एकर जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल, गृह, नगरविकास, पर्यावरण अशा विविध विभागांतील सरकारी बाबूंना हाताशी धरून मोठा घोटाळा करण्यात आला.

Advertisements

या हडपलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारले आहेत. हे भव्य गृहप्रकल्प तयार करून करोडो रुपयांची माया जमवली असतानाच जमीनधारक व ताबेधारकांना मात्र कोटय़वधी रुपयांचा चुना लावला आहे. सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून लोढा बिल्डरने भूमिपुत्रांची घोर फसवणूक केली असून आमचे हक्काचे पैसे तरी द्या, असा आर्त टाहो स्थानिक शेतकरी, ताबेदारांनी फोडला आहे. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मंत्रालयासमोर कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.

Advertisements

लोढा ग्रुपने पंधरा ते वीस वर्षांपासून सरकारी यंत्रणेला हाताशी धरले व कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, पनवेल या भागांतील असंख्य शेतकऱयांच्या व ताबेदारांच्या शेकडो एकर जमिनी बळकावल्या. त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या. त्यात पलावा, कासाबेला, कासारिओ, लेकश्योर आदींचा समावेश आहे. अनेक ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या जमिनींवर उभारलेले फ्लॅट्स विकून अमाप नफा मिळवला, पण ज्या शेतकऱयांच्या व ताबेदारांच्या जमिनी साम-दाम-दंड-भेद वापरून ताब्यात घेतल्या त्या भूमिपुत्रांना हक्काचा मोबदला दिला नाही. त्यामुळे शेतकरी बचाव समिती एकवटली असून गेली 12 वर्षे न्यायासाठी भूमिपुत्रांचा लढा सुरू आहे.

#अन्यायाविरोधात शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष बबन तेटमे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह 39 जणांना निवेदन पाठवले आहे.

#कल्याण ग्रामीण भागातील बबन तेटमे (घेसर), मोहन ठाकरे (पागडय़ाचा पाडा, खोणी), बाबूराव पाटील (घेसर), प्रमोद पाटील (वडवली, बाळे), सुदाम म्हात्रे (कोळे गाव), गोपीनाथ पाटील (सिद्धी करवले) या शेतकऱयांच्या जमिनी लोढा बिल्डरने हडपल्या आहेत.

#गुंड, दलाल तसेच राजकीय दबाव वापरून लोढा बिल्डर ग्रुपने कल्याण ग्रामीणमधील जमिनी लाटल्याचा आरोप शेतकरी बचाव समितीने केला आहे. लोढा ग्रुपचे सर्वेसर्वा व भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे महापालिका व सरकारी यंत्रणेचा दबाव शेतकऱयांवर टाकला असल्याचा दावा निवेदनात केला आहे.

#मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या ग्रुपचे संचालक राजेंद्र लोढा, बाबूसिंग राजगुरू, सचिन पाटील, वसंत बने, गजानन जुईकर यांना हाताशी धरून शेतकरी व ताबेदारांची जमीन हडपल्याचा आरोप शेतकरी बचाव समितीने केला आहे.

बाजारभावाप्रमाणे या शेतकऱयांचे पैसे लटकवले
नाव रक्कम (कोटींमध्ये)

मोहन ठाकरे 15
बबन तेटमे 9.50
बाबूराव पाटील 15
मोहन फुलोरे 6.80
संतोष फराड 12
गोपीनाथ पाटील 12
प्रमोद पाटील 8.35
सुदाम म्हात्रे 80 लाख

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *