केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर असल्याचे भासवून पत्रकार सुनील कुहीकर यांच्यासह इतर सात जणांची 48 लाख 45 हजार रूपयांनी नागपुरात फसवणूक केली. ही घटना 11 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
या प्रकरणातील आरोपी अनिरूद्ध आनंदकुमार होशिंग याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून 80 लाख रूपयांची बीएमडब्ल्यू व 6 हजार 300 रूपये रोख जप्त करण्यात आले असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर असल्याचे भासवून पत्रकार सुनील कुहीकर यांच्यासह इतर सात जणांची 48 लाख 45 हजार रूपयांनी फसवणूक केल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणातील आरोपी अनिरूद्ध आनंदकुमार होशिंग याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून 80 लाख रूपयांची बीएमडब्ल्यू व 6 हजार 300 रूपये रोख जप्त करण्यात आले असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सुनिल वसंतराव कुहीकर हे पत्रकार असून एक स्थानिक पोर्टल चालवतात. आरोपी अनिरूध्द आनंदकुमार होशिंग याने सुनील कुहीकर यांच्यासह इतर गुंतवणुकदारांना आपण केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर असल्याची बतावणी केली. त्याने केंद्रीय मंत्रालयातील वरिष्ठ नेत्यांचे, उत्तर प्रदेश सरकारातील वरिष्ठ नेत्यांचे तसेच केंद्रीय वरिष्ठ अधिकारी व बॉलिवूडमधील काही प्रसिध्द कलाकारांची नावे असलेल्या बनावट पत्रिका तयार करून त्या फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना दिल्या. त्यावरून त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
कोणताही आर्थिक परतावा न देता कुहीकर यांच्यासह इतरांनी गुंतवणुक केलेली रक्कम अद्याप पावेतो परत केलेली नाही. आरोपीने केंद्रीय पर्यटन विभागातील बडा अधिकारी असल्याचे सांगितल्याने कुहीकर यांच्यासह इतर गुंतवणूकदारही बळी पडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा स्थळ प्रताप नगर पोलिस ठाणे येत असल्याने तेथे गुन्हा दाखल करण्यात आला. अनिरूद्ध होशिंग याने या व्यतिरिक्त आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.