नागपुरात विमानातील पायलटला हृदयविकाराचा धक्का… काय झालं वाचा…!

नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. टेकऑफपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना गुरुवारी नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम ( 40) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. पुण्याच्या दिशेन उड्डाण भरण्याच्या तयारी असताना त्यांना विमानतळावरच हृदयविकाराचा झटका आला अन त्यात त्यांचे प्राण गेले.

बोर्डिंग गेटजवळच कोसळले कॅप्टन
इंडिगो एअरलाइन्सचे नागपूर-पुणे विमान दुपारी एक वाजेच्या सुमारास उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उचलण्यात आले.

विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलच्या मेडिकल टीमने त्यांची तपासणी केली. त्यानुसार, त्यांना हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र, मनोज ब्रॉड डेड असल्याचे कळताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. अशी माहिती किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक एजाज शमी यांनी काही माध्यमांना बोलताना दिली.

हृदयविकाराचा झटका, प्राथमिक अंदाज

प्राप्त माहितीनुसार, उद्या, शुक्रवारी शवविच्छेदन होणार आहे. तुर्तास, मनोज यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगण्यात येत असले तरी शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीकडून शोकसंवेदना व्यक्त
वैमानिक मनोज सुब्रमण्ययम यांच्या मृत्यूनंतर इंडिगो एअरलाइन्सने निवेदन जारी करत शोकसंवेदना व्यक्त केली. आज नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाचे निधन झाल्याचे दुःख आहे. नागपूर विमानतळावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे दुर्दैवी निधन झाले, असे कंपनीने त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांना हा धक्का सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली आहे.

वैमानिकासाठी 27 तासांची विश्रांती गरजेची
पायलट रोस्टरनुसार, सुब्रमण्यम यांनी हृदयविकाराच्या आधी दोन सेक्टर (तिरुवनंतपुरम-पुणे-नागपूर) उड्डाण केले होते. 16 ऑगस्ट रोजी सुब्रमण्यम यांनी पहाटे 3 ते 7 या वेळेत उड्डाण केले. यानंतर त्यांनी 27 तास विश्रांती घेतली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता विमान उड्डाण करणार होते, परंतु त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

भारतीय वंशाच्या पायलटचा एक दिवसापूर्वी मृत्यू
बुधवारी (16 ऑगस्ट) फ्लाइट QR 579 दिल्लीहून दोहाला जात होती. तेव्हाच त्यांच्या पायलटची प्रकृती खालावली. विमान दुबई विमानतळावर उतरवण्यात आले. यादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो अतिरिक्त क्रू मेंबर म्हणून फ्लाइटमध्ये होता आणि तो भारतीय वंशाचा होता.

मियामीमध्ये देखील घडली अशीच घटना
अशीच एक घटना 14 ऑगस्ट रोजी मियामीहून चिलीला जाणाऱ्या विमानात उघडकीस आली होती. पायलट इव्हान अंदूर (56) विमानाच्या बाथरूममध्ये कोसळला. पायलट इव्हान 271 प्रवाशांसह LA505 उडवत होते. त्यांनाही हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. मात्र, विमानात इतर वैमानिकही होते. पनामाच्या टोकुमेन विमानतळावर त्यांनी इमर्जन्सी लँडिंग केले.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *