Breaking News

एकाच गावात चार वाघ दिसल्याने गावकऱ्यामध्ये भीती

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी गावातील शेताशिवारातील झुडपी जंगलात एक वाघ, वाघीण आणि दोन शावकांसह ४ वाघ फिरत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, याबाबतीत सावली वनविभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

गावाला लागून असलेल्या शिवमंदिराजवळ गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चार वाघ दिसल्याने नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वाघांनी रानडुकराची शिकार केल्याचे दिसून आले. सदरची माहिती तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक कोडापे, वनरक्षक आखाडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर हेसुद्धा पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

जंगली श्वापदाच्या अस्तित्वामुळे शेतीची कामे प्रभावित झाली असल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आंदोलन केले. वन्यप्राण्यांचे दर्शन आणि मानवावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार सावली तालुक्यात घडत आहेत. वाघ, बिबट्या, रानडुक्कर, लांडगे असे वन्य प्राणी सावली तालुक्यातील जंगलात सहज दिसतात. तालुक्यातील ९० टक्के कृषी क्षेत्र जंगलाने वेढलेले आहे. वाघांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने या भागात चार कॅमेरे बसवले आहेत. मात्र वन्य प्राण्यांच्या दहशतीपासून पूर्णपणे मुक्ती मिळावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. शेतीच्या कामांवर परिणाम होत असून शेतमजूर काम करण्यास नकार देत आहेत.

About विश्व भारत

Check Also

गन्ना खेेत में मादा तेंदुए ने शावक को दिया जन्म

गन्ना खेेत में मादा तेंदुए ने शावक को दिया जन्म टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

पेंच टाइगर रिजर्व में पर्यटक वाहनों के पंजीकरण को लेकर असमंजस

पेंच टाइगर रिजर्व में पर्यटक वाहनों के पंजीकरण को लेकर असमंजस टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *