राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली, मंत्र्याने दिले संकेत

जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही. पावसाळ्यात २१ पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रिम पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ‘पाऊस पडावा, यासाठी आपण देवाला प्रार्थना करु. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पडण्याबाबत प्रश्न मांडला आहे. कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

राज्यात पावसाने ओढ दिली असल्याने पिके धोक्यात आली आहेत. ऐन श्रावणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करुन त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे. दुष्काळाचे भीषण वास्तव समोर असताना सरकार मात्र त्याबाबत उदासीन आहे. या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारमध्ये असताना अशीच दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी महसूलमंत्री म्हणून राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली होती, असे खडसे यांनी नमूद केले आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *