Breaking News

मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून द्या,अन्यथा मंत्रालय उडवू!

Advertisements

मुख्यमंत्र्यांशी तातडीने बोलणे करून द्या, नाही तर मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन गुरुवारी आल्याने मंत्रालय परिसरात खळबळ उडाली. फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी फोन करणाऱ्याला शोधून काढले. तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, त्यांच्याशी बोलणे न झाल्याने त्याने धमकी देणारा फोन केला. परंतु पोलिसांनी त्याला शोधून काढले. दरम्यान, मेट्रो रेल्वेच्या कामासाठी स्फोट करताना मंत्रालयावर दगडांचा अक्षरश: वर्षाव झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisements

मंत्रालयात चाकू नेणारा उमरग्याचा तरुण ताब्यात

Advertisements

मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर एकाला ताब्यात घेण्यात आले. बॅग स्कॅन करताना त्याच्याकडे धारदार चाकू सापडला. संबंधित तरुण उमरगा येथील रहिवासी आहे. त्याने चाकू नेमका कशासाठी आणला होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *