चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राहत सय्यद (३०) असे मृतक महिलेचे नाव असून ताहेमिम शेख (३८) असे हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
प्रकरण काय आहे?
मृतक राहत सय्यद ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख होत्या. कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक नजद गुलाब सैय्यद यांची ती मुलगी असून आपल्या वडिलांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर पती व दोन मुलांसह राहायची. आरोपी पती हा नेहमीच राहतवर संशय घेत होता असे कळते. दरम्यान माध्यरात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडन झाले असता संशयाचा भूत डोक्यात शिरल्याने त्याने आपल्या मुलांसमोर पत्नी राहत ची चाकू भोसकून हत्या केली. हत्येनंतर आरोपी ताहेमिम शेख ने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. मृतक राहतच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात भरती होते. पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी घरी गेले असता नातवांनी घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी वर जाऊन बघितले तर राहत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.