Breaking News

कोरोना पेक्षा भयंकर व्हायरस भारतात आलाय : अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन

Advertisements

कोरोनामुळे 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासह जगासाठी आव्हानात्मक होती. कोरोनामुळे या 2 वर्षांच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला. या कोरोनामुळे अनेकांनी जवळची माणसं गमावली. अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. आर्थिक गणितं फिस्कटली. एकूणच कोरोनाने सर्वांचीच कंबर मोडून काढली. हा जीवघेणा कोरोना वर्षभरापासून नियंत्रणात आलाय. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफने दिवस रात्र मेहनत घेतली. त्यानंतर कुठे सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरळीत झालं.

Advertisements

कोरोनाचा ओसरता जोर पाहता राज्यासह देशात निर्बंध हटवण्यात आली. त्यानंतर पूर्णपणे सरसकट लॉकडाऊन हटवलं गेलं. त्यामुळे सर्व व्यवहार पुन्हा नियमित झालाय. आता राज्यासह देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गणेशोत्सवाला मोजून काही तास शिल्लक आहेत. त्याआधी मोठ्या उत्साहात आगमन सोहळे सुरु आहेत.या आगमन सोहळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भक्तांचा एकच उपस्थिती पाहायला मिळतेय. मात्र या दरम्यान एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Advertisements

कोरोनापेक्षा भयंकर आणि जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होत मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सण आणि कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. हा सर्व प्रकार नक्की कुठे घडलाय आपण जाणून घेऊयात.

निपाह व्हायरसचा ‘ताप’
कोरोनानंतर निपाह या व्हारसने सर्वांची चिंता वाढवलीय. निपाह व्हायरसमुळे धोका वाढला आहे. या निपाह व्हायरसचा केरळ राज्यात एक रुग्ण वाढला आहे. त्यामुळे केरळातील निपाह व्हायरस बाधित रुग्णांचा आकडा हा आता 6 वर पोहचला आहे. या निपाहने आतापर्यंत दोघांना दीव घेतलाय.

निपाह हळुहळु हातपाय पसरतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे. केरळ सरकारने खबरदारी घेत कोझीकोडेत मिनी लॉकडाऊन जाही केलाय. ज्या भागात निपाहचे रुग्ण आढळलेत, तिथे ठराविक वेळेतच जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी वेळ ठरवून दिलाय. त्यामुळे आता केरळ आणि इतर राज्यांसाठीही येते काही दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

“तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही” : सरन्यायाधीश चंद्रचूड आणखी काय म्हणाले वकिलांना?

आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो, पण स्वतःला नाही. आपण आपली सचोटी कशी राखतो यावर आपला …

हिंदू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा की मणिपूर के मैतेई हिंदू समुदाय सें बैठक

नई दिल्ली स्थित मंदिर मार्गपर अखिल भारत हिन्दू महासभा के मुख्यालय हिन्दू महासभा भवन में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *