Breaking News

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

Advertisements

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली असून अनेक गावाचा तालुक्याची संपर्क तुटला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील पेंच-तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने रामटेक, मौदा, कामठी, पारशिवनी तालुक्यातील गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, पाण्याची पातळी कमी होत आहे. पिकांचे नुकसान झाले आहे.

Advertisements

विदर्भातील भंडारा येथील पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने 15 सप्टेंबरला गोसे खुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. याबाबतची सूचना गोसे खुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा म्हणून वैनगंगा नदी काठावरील गावांतील नागरिकांना दिला आहे. पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी नाले, वाही, अथवा नदीनाल्यातून आवागमन करू नये अशा सूचना स्थानिक पातळीवरील प्रशासनाने दिल्या आहेत.

Advertisements

चंद्रपुरातील मुसळधार पावसामुळे झाड कोसळले
संततधार पावसामुळे 200 घरात शिरले पाणी
22 जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचं थैमान

गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणे वाढ झाल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. तालुक्यातील रनमोचन, खरकाडा ( पिंपळगाव), जुगनाळा, किन्ही, मांगली, बेटाळा, बोळेगाव, अरेरनवरगाव, कोल्हारी, बेलगाव, लाडज, पिंपळगाव, चिखलगाव भालेश्वर सोंदरी, सावरगाव, सोनेगाव, निलज ,गांगलवाडी, पाचगाव , बरडकिन्ही, चीचगाव , आवळगाव, गावासह अनेक गावात संपर्क तुटून शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली आल्या असून धानपीक, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर परिस्थिती कडे महसूल व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन करीत केले आहे.

गोसेखुर्द धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान प्रशासनाने देसाईगंज आणि गडचिरोली तालुक्यातील १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार #पाऊस पडल्याने आणि गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, गडचिरोली- आरमोरी व गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने, तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १७ हजार ३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून,नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडलयाने आणि गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी आणि गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे. #गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात आज मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडलयाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ११ वाजतापर्यंत पाऊस सुरु होता. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान होते. मागील चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *