Breaking News

आदित्य ठाकरे आणि अखिल भारत हिंदू महासभेचे मोहन कारेमोरे यांच्यात भेट

Advertisements

शिवसेना पक्षाला खिंडार पडून आता एका वर्षा हून अधिक काळ झाला आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टोकाची टीका करण्यात आलीय. या सगळ्या घडामोडींदरम्यान विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे समोरासमोर आल्याची बातमी समोर आली होती. त्यातच आता नवी घडामोड समोर येत आहे.

Advertisements

आदित्य ठाकरे आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांची नागपूर अधिवेशनात भेट झाली. त्यात उद्धव ठाकरे गट आणि अखिल भारत हिंदू महासभा लवकरच एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. यावर प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरु आहे. आदित्य ठाकरे लवकरच बोलविणार असल्याचे मोहन कारेमोरे यांनी सांगितले. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आहेत. त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

छत्रपती संभाजीनगरमध्ये सेनेच्या चंद्रकांत खैरेचं पारडं जड?भुमरे आणि जलील यांचे काय होणार?

मराठवाड्याची राजधानी अशी छत्रपती संभाजीनगर शहराची आजची ओळख असली तरी ती पहिली ओळख नाही. हे …

“क्या शिवसेना चिल्लर पार्टी है?” विलय को लेकर शरद पवार की टिप्पणी पर बढ़ा बवाल? जानिए किसने क्या कहा

“क्या शिवसेना चिल्लर पार्टी है?” विलय को लेकर शरद पवार की टिप्पणी पर बढ़ा बवाल? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *