Breaking News

नागपूर जिल्ह्यात स्फोट : 9 कामगारांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘X’ खात्यावर पोस्ट करत मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्‍यांच्‍या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नागपुरातील बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी सकाळी स्फोट झाला. कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नागपूरचे पाेलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः पाेलीस महानिरीक्षक, पाेलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.” या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते तौसिफ़ खान पठाण यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल:शहीदों को श्रद्धांजलि

आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल: शहीदों को श्रद्धांजलि टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *