Breaking News

“पाकिस्तानात रोज बलात्कार…” : मला कराचीत दोनदा…प्रसिद्ध अभिनेत्रीचे वक्तव्य

Advertisements

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने तिच्या देशातील काही समस्यांवर मत व्यक्त केलंय. पाकिस्तानमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल तिने भाष्य केलं आहे. तसेच देशात महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणं नसल्याबद्दल आयशाने चिंता व्यक्त केली आहे.

Advertisements

अदनान फैझलबरोबर पॉडकास्टमध्ये संवाद साधताना आयशाने पाकिस्तानमधील महिलांच्या परिस्थितीवर तिची मतं मांडली. “मला इथं सुरक्षित वाटत नाही. मला रस्त्यावर चालायचं आहे, मला कारमध्ये बसून न राहता मोकळेपणाने रस्त्यांवर सायकल चालवायची आहे. बाहेर मोकळ्या हवेत चालणं ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे मी रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकत नाही,” असं आयशा म्हणाली.

Advertisements

आयशा पुढे म्हणाली, “इथे मला नेहमीच मानसिक त्रास आणि चिंता जाणवते. पाकिस्तानी स्त्री कोणत्या वातावरणात वाढत आहे हे इथला पुरुष कधीच समजू शकत नाहीत. ज्यांना मुली, बहिणी, बायको, आई आहेत ते समजू शकतात. पण हा त्रास एका स्त्रीशिवाय कुणालाही जाणवू शकत नाही. इथे प्रत्येक क्षणी पाकिस्तानी महिला घाबरत जगत असते.”

आयशाने तिला आलेले वाईट अनुभवही सांगितले. “मला कराचीत दोनदा लुटलं गेलं. पाकिस्तानमध्ये तो दिवस कधी येईल जेव्हा मी अपहरण, बलात्कार आणि चोरांच्या भीतीशिवाय आरामदायी जीवन जगू शकेन,” असा प्रश्न तिने विचारला. तसेच स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या मूलभूत मानवी गरजा असल्याचंही तिने नमूद केले.

आयशाने सांगितलं की तिची आई वयाच्या ३० व्या वर्षी विधवा झाली होती. तेव्हापासून आईने तिला आणि तिच्या भावाला एकटीने वाढवलं, त्या काळात त्यांना पाकिस्तानमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिचा भाऊ कायमचा पाकिस्तान सोडून डेन्मार्कला निघून गेला आहे, आता आयशा आणि तिची आई देखील पाकिस्तान सोडू इच्छित आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शबाना आजमी ने जावेद अख्तर से की थी ‘ब्रेकअप’ की कोशिश

शबाना आजमी की लाइफ के कई ऐसे किस्से हैं, जिनके बारे में ज्यादातर लोग नहीं …

अनुष्का शर्मा का पहला ऑडिशन देख हो जाएंगे उनकी मासूमियत के दीवाने, देखिए किस तरह हुई थी बाॅलीवुड में एंट्री

अनुष्का शर्मा का पहला ऑडिशन देख हो जाएंगे उनकी मासूमियत के दीवाने, देखिए किस तरह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *