Breaking News

‘… तर कार्यक्रम करुन टाकतो’ : CM शिंदेंचं हातवारे करून विधान

Advertisements

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं कुणाला उत्तर आहे? हे अजून कळले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, ‘ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,’ असं अगदी हातवारे करुन सांगतात. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा संवाद व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे. यानंतरही नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदे एकमेकांशी हसून काहीतरी बोलतात. मात्र व्हिडीओमध्ये त्यांच्या संवादामधील शेवटची काही वाक्य स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. तरी या दोघांमधील ही चर्चा नेमकी कोणाबद्दल होती याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Advertisements

नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांची प्रवेशद्वाराजवळ भेट झाली. दोन्ही नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना व्हिडीओत दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे एका हाताने चष्मा सरळ करत असतानाचा नाना पटोले, ‘हे काय चाललंय? तुम्हीच त्यांना मोठं केलंय,’ असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी हातवारे करुन उत्तर देताना दिसत आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार …

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक : नागपूर किती?

दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *