Breaking News

नागपुरातील क्लबमध्ये युवक-युवतींमध्ये प्रचंड हाणामारी

Advertisements

नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका क्लबमध्ये आलेल्या ग्राहक महिला व पुरुषामध्ये भांडण झाले. त्यांच्यात मध्यस्थी करायला गेलेली महिला सुरक्षारक्षक काचेच्या बॉटलने जखमी झाली. या प्रकरणामुळे क्लबमधील गैरप्रकार परत एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

Advertisements

 

शिवाजीनगर येथे सायक्लॉन क्लब आहे. तेथे शुभम सिंग (३०, न्यू अशोक नगर, नवी दिल्ली), सिमरन सिंग (३०, पश्चिम विहार, नवी दिल्ली), तिची लहान बहीण तानिया सिंग (२८) हे शनिवारी रात्री पोहोचले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ते क्लबमध्येच होते. रात्री दीड वाजता सर्वच ग्राहक बाहेर निघत होते. त्यावेळी सिमरन व शुभम यांच्यात भांडणाला सुरुवात झाली.

Advertisements

 

नशेत असल्याने वाद वाढला व सिमरनने बिअरची काचेची बॉटल शुभमच्या दिशेने जोरात फेकून मारली. अमरजित नावाची एक महिला सुरक्षारक्षक मध्ये आली व तिच्या डोक्यावर ती बॉटल जोरात लागली. त्यानंतर तीच बॉटल महेश नावाच्या बाऊन्सरलादेखील लागली. दुसरीकडे सिमरन व शुभम यांच्यातील भांडण सुरूच होते. इतर बाऊन्सर्सने त्यांना बाहेर काढले. त्यावेळी सिमरन व तिच्या बहिणीने आशा नावाच्या एका महिला बाऊन्सरला अश्लिल शिवीगाळ केली व तिला मारहाणदेखील केली.

 

अखेर त्यांना बाहेर काढण्यात आले. यानंतर जखमी महिला बाऊन्सर अमरजित हिने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्कूली छात्राओं का अश्लील वीडियो वायरल करने वाले शिक्षक सहित 11 आरोपी गिरफ्तार

स्कूली छात्राओं का अश्लील वीडियो वायरल करने वाले शिक्षक सहित 11 आरोपी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया …

सिलिंडर स्फोटात चार चिमुकल्यांसह नऊ गंभीर

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्‍यांसह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *