बायकोनं सासरी नांदायला येण्यासाठी चक्क दारू आणि मटनाची अट ठेवली आहे. यामुळे वैतागून तिच्या नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने बायकोच्या कुटुंबीयांवर फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. घटना राजस्थान मधील आहे.
तिच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले की, मागील वर्षी त्याची बायको रक्षाबंधननिमित्ताने माहेरी गेली होती.तेव्हापासून ती सासरी परतलेली नाही. नेहा आणि चिराग असं या जोडप्याचं नाव आहे. जेव्हा चिरागने नेहाला सासरी परत येण्यासाठी विचारलं, तेव्हा नेहाने त्याच्यासमोर अशी विचित्र अट ठेवली.
त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला नेहा जैन या मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणाऱ्या मुलीचं स्थळ सुचवलं. दोन्ही कुटुंबीय एकमेकांशी बोलले.दोन लाख रुपयांची गरज असल्याचं मुलीच्या कुटुंबीयांनी चिरागला सांगितलं.
चिरागला नेहा आवडली. त्यांचं लग्न २ लाख रूपयांच्या अटीवर निश्चित झालं होतं. त्यानंतर त्यांनी जून 2023 मध्ये लग्न केलं. पण सासरच्या घरी पोहोचताच नेहाने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच नेहाचे वडील चिरागच्या घरी आले. लग्नानंतर घरी काही विधी पूर्ण करायचे आहेत, असं सांगून नेहाला सोबत घेवून गेले. काही दिवसांनी ती सासरी परतली. परंतु सारखी अज्ञात व्यक्तीसोबत फोनवर तासनतास बोलत असायची.