Breaking News

विनयभंगाच्या सीनआधी माधुरी दीक्षितने काय केले? वाचा

Advertisements

प्रसिद्ध अभिनेते रणजीत यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध खलनायक रणजीत यांनी एका मुलाखतीत माधुरी दीक्षितबरोबर शूटिंगची एक आठवण सांगितली आहे. ‘प्रेम प्रतिज्ञा’ चित्रपटात विनयभंगाचा एक सीन शूट करायचा होता, पण तो सीन करण्याआधी माधुरी खूप रडली होती, असं ते म्हणाले.

Advertisements

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत रणजीत म्हणाले, “ती (माधुरी दीक्षित) रडू लागली आणि सीन करण्यास नकार दिला. मला परिस्थितीची कल्पना नव्हती. मला काही कला दिग्दर्शकांनी याबद्दल सांगितलं होतं. त्यातला एक बंगाली होता. आमचे दिग्दर्शक बापू होते आणि ते दक्षिण भारतीय होते. मी सेटवर मजा करायचो ‘डार्लिंग थोडं तिकडे बघ, मी कपडे बदलतो,’ असं सह-कलाकारांना म्हणायचो. मला तर मेकअप रुममध्ये जायचीही सवय नव्हती. मी तसाच होतो आणि मला तसंच स्वीकारलं गेलं.”

Advertisements

 

विनयभंगाचा सीन हातगाडीवर होणार होता आणि ते माधुरीची वाट पाहत होते, असं त्यांनी सांगितलं. “तिचं रडणं चालूच होतं, मला दुसऱ्या शूटला जायचं होतं आणि मी त्यांना माधुरीला बोलवायला सांगितलं. पण माधुरी या सीनसाठी तयार नसल्याचं मला कुणीच सांगितलं नाही. शेवटी तिने होकार दिला. वीरू देवगण फाइट मास्टर होते. ते म्हणाले ‘आम्ही कॅमेरा फिरवत राहू, सीन मध्येच कट व्हायला नको.’ विनयभंग हा आमच्या कामाचा भाग आहे. खलनायक खऱ्या आयुष्यात वाईट नसतो,” असं रणजीत म्हणाले.

 

चित्रपटातील असे जबरदस्तीचे, विनयभंगाचे सीन खूप काळजीपूर्वक शूट केले जायचे. बऱ्याचदा अशा सीनमध्ये मी दुरुस्त्या सुचवायचो आणि दिग्दर्शक ते मान्य करायचे, असंही रणजीत यांनी या मुलाखतीत सांगितलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

लग्न आणि मूलं नको : अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण?

बदलत्या जीवनशैलीनुसार राहणीमानात आणि नातेसंबंधातही बदल होताना दिसत आहे. लग्न उशिरा करणारी पिढी आता NO …

सलमान खान १ BHK घरात का राहतो?

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *