आई-वडील दिल्लीत आणि मी जुहूमध्ये राहायचो. संध्याकाळी तिथे सगळे एकत्र जमायचे. यावेळी तिथे कोणतेही प्रतिबंध किंवा औपचारिकता असा काही प्रकार नव्हता”.
रणजीत यांनी यावेळी अभिनेत्री कशाप्रकारे स्वयंपाक करायच्या हेदेखील सांगितलं. “रिना रॉय पराठा, मौसमी चॅटर्जी मासे, नितू कपूर भेंडी आणि परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची. तिथे अशा प्रकारचं वातावरण असायचं”,असं प्रसिद्ध अभिनेता रणजित यांनी राजेश खन्नाबद्दल सांगितलं.
यावेळी त्यांनी खुलासा केला की, “राजेश खन्नासारखे लोक एका रात्रीत एक ते दोन बाटल्या संपवायचे”. आपण अनेकदा एकापेक्षा जास्त शिफ्ट करुन घऱी परतलो तरी अनेकदा पार्टी त्याच उत्साहात सुरु असायची असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “मी फार धन्य आहे. मला वाटतं त्या घरात पाहुण्याचं स्वागत होत होतं, त्यामागे देवाचा आशीर्वाद होता. माझ्या बंगल्यात लोकांचं मनोरंजन करण्यासाठी पुरेशी जागा होता. तिथे तितकेच कर्मचारीही होते”.