Breaking News

घरी आयकरचे छापे पडत असताना रेखा करीत होती लैंगिक कृत्य

पाटणा सोडून शेखर सुमन मुंबईत आल्यावर अवघ्या दोन आठवड्यांनी त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाचं नाव ‘उत्सव’ होतं आणि यात रेखा यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. आता ४० वर्षांनी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर काम करण्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटात रेखा व शेखर यांचे इंटिमेट सीन्स होते, पण अभिनेत्रीने कोणतीही तक्रार न करता हे सर्व सीन शूट केले होते, असं शेखर सुमन म्हणाले.

 

शेखर सुमन यांनी रेखा यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करण्याचं कौतुक केलं. आयकर विभागाकडून रेखा यांच्या घरावर छापेमारी केली जात होती, पण तरीही त्यांनी सेटवर चित्रपटाचं शूटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, अशी आठवण शेखर यांनी सांगितली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ‘उत्सव’विषयी शेखर म्हणाले, “भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील कोणत्याही नवोदित कलाकारासाठी पदार्पणाची ही कदाचित सर्वात अप्रतिम संधी असेल. मी माझी सुटकेसही उघडली नव्हती आणि १५ दिवसांत मला चित्रपटासाठी साइन केलं गेलं. त्यानंतर दोन महिन्यांत मी रेखासोबत शूटिंग करत सेटवर होतो. शशी कपूर, गिरीश कर्नाड, रेखा या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.”

 

शेखर पुढे म्हणाले, “मी रेखापेक्षा जास्त प्रोफेशनल कलाकाराला आजवर भेटलो नाही. मला आठवतं की शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी झाली होती. इतर कोणीही कलाकार असता तर आपली बॅग भरून सेटवरून निघून गेला असता. पण त्या म्हणाल्या, ‘त्यांना त्यांचं काम करू द्या, मी इथं राहून माझं काम करेन’. त्यावेळी मला भीती वाटत होती की त्या निघून जातील, चित्रपट बंद होईल आणि माझी स्वप्नं अपूर्ण राहतील, पण त्या गेल्या नाहीत.”

 

रेखा सेटवर कधीच नखरे दाखवायच्या नाही, अगदी इंटिमेट सीनच्या बाबतीतही नाही, असं शेखर यांनी सांगितलं. “त्यांनी मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना कधीच कुठेही स्पर्श करण्यास मनाई केली नाही, त्या इतर अभिनेत्रींप्रमाणे नाहीत. त्या व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करणाऱ्या आहेत. मी त्यांचा कायम ऋणी राहीन,” असं शेअर म्हणाले.

 

पुढे शेअर म्हणाले, “उत्सवनंतर मी बरेच चित्रपट केले, मी मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केलं, परंतु काही वेळानंतर चांगल्या भूमिका कमी मिळू लागल्या, त्यामुळे मी एक पाऊल मागे घ्यायचं ठरवलं. पण नियती प्रत्येकाच्या आयुष्यात मोठी भूमिका बजावते. मी काय मिळालं नाही, याऐवजी काय मिळवलं याकडे लक्ष देतो. मी पाटण्यातील एक साधासा मुलगा होतो, ज्याने इतक्या मोठ्या दिग्गजांबरोबर काम करता येईल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.”

दरम्यान, ४० वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या शेखर सुमन यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी टीव्ही शोचे परीक्षक म्हणून काम पाहिलं, शो होस्ट देखील केले. लवकरच ते संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये दिसणार आहेत.

About विश्व भारत

Check Also

Actor Manoj Kumar dies at 87 : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे…!

Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the …

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *