Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

Advertisements

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलला कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Advertisements

अकोला जिल्ह्यात सायबर फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक करून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ‘सायबर फ्रॉड’ करणाऱ्यांनी आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या छायाचित्राचा देखील वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार +८५६२०९८३९२७४०, तसेच + ९१ ९३३२९३९१२८ या भ्रमणध्वनी क्रमांकांहून घडत आहे. आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नावे संदेश प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच, त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisements

या प्रकारचा संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ चौकशी, तसेच कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत. या क्रमांकावरून येणाऱ्या संदेशवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा खात्यावरून संदेश येताच, तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पतीच्या मित्राकडून विवाहितेवर अत्याचार

यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेस पेढ्यात गुंगीचे औषध …

नागपुरात मतदानानंतर तब्बल २५ दिवसांनी भाजपचा मतदार यादीवर आक्षेप

नागपूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान झाल्यावर पंचवीस दिवसांनंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *