महाराष्ट्रात झालेल्या भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मला जबाबदारीतून मोकळं करण्याची विनंती फडणवीस यांनी केली होती.’ फडणवीस यांच्या या विनंतीला भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी उत्तर दिलंय. शाह यांनी फडणवीस यांना राजीनामा न देण्याची सूचना केलीय. चंद्रशेखर बावनकुळेचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात असल्याची चर्चा आहे.
काय म्हणाले अमित शाह?
फडणवीस यांनी राज्य सरकारमधील काम सुरु ठेवावं, अशी सूचना अमित शाह यांनी केलीय. तुम्ही राजीनामा दिला तर त्याचा भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणान होईल. आपण शपथविधीच्या कार्यक्रमानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करु, असं सांगत अमित शाह यांनी फडणवीस यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात भाजपासाठी काय करता येईल, याची योजना तयार करा आणि त्यावर काम सुरु करा अशी सूचना देखील शाह यांनी फडणवीस यांना केली आहे.