Breaking News

“त्याने माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” : अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा अजूनही कायम आहे. १ मेला प्रदर्शित झालेल्या या सीरिजला आता महिना पूर्ण झाला आहे, तरीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सीरिजच्या कथेपासून ते सीन्स, गाणी, कलाकारांचा अभिनय याविषयी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सीरिजच्या अनेक व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल यांनी ‘हीरामंडी’मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सर्व अभिनेत्रींच्या कामाचं कौतुक होतं आहे. यापैकी एक म्हणजे संजीदा शेख. ‘हीरामंडी’मध्ये वहीदा पात्र साकारणाऱ्या संजीदाने नुकत्याच एका मुलाखतीमधून तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला.

 

‘हीरामंडी’ वेब सीरिजच्या यशानंतर अभिनेत्री संजीदा शेख अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतीच तिने ‘हॉटरफ्लाय’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आणि बरेच खुलासे देखील केले. याच मुलाखतीत संजीदाने तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला; जो एका नाईट क्लबमध्ये घडला होता.

 

संजीदा म्हणाली, “मला एक धक्कादायक प्रसंग आठवत आहे. पण तो कुठल्या मुलाकडून नाहीतर मुलीकडून झाला होता. मी एका नाईट क्लबमध्ये गेली होती. माझ्याबाजूने एक मुलगी जात होती. तिने माझ्या स्तनांना स्पर्श केला आणि ती तिथून निघून गेली. या घटनेमुळे मला धक्का बसला होता. मला कळतं नव्हतं माझ्याबरोबर नेमकं काय घडलंय. आपण नेहमी ऐकतो की, पुरुष मागे मारतात, गैरवर्तणुक करतात. पण यात मुली काही कमी नाहीत.

 

दरम्यान, संजीदा शेखच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले आहेत. २०१२ मध्ये संजीदाने अभिनेता आमिर अलीबरोबर लग्न केलं होतं. पण लग्नाच्या १० वर्षांनंतर २०२२मध्ये तिचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी असून तिचा सांभाळ अभिनेत्री करते. संजीदा व आमिर अलीने एकत्र छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘नच बलिए’ केला होता.

About विश्व भारत

Check Also

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे टेकचंद्र सनोडिया …

आलिया भट्ट की फेवरेट सेक्‍स पोजीशन क्या है?सेक्स लाइफ को लेकर खुलासे

: बॉलीवुड के सेलेब्‍स अपनी सेक्‍स लाइफ या निजी जिंदगी के बारे में कम बात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *