Breaking News

महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा

येत्या 48 तास महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, या भागांसाठी IMD कडून धोक्याचा इशारा

 

▪️ हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

▪️उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

▪️ विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

▪️ दरम्यान नुसता पाऊस पडणार नसून पावसासोबत वादळाचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 – 60 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे.

 

▪️ मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

About विश्व भारत

Check Also

फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?

लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली …

नागपुरात पावसाचा अंदाज!कांदा, धान, मका

राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *