Breaking News

नागपूर, रामटेकमध्ये देहव्यापारासाठी आणल्या दार्जिलिंगच्या तरुणी

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये देहव्यापार करण्यासाठी दार्जिलिंग शहरातील तरुणींना दलाल आणत आहेत. त्यांचे आर्थिक शोषण करुन त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत आहेत. रामटेक परीसरातील हिवरा मार्गावरील नेचर पॉईंट हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात दार्जिलिंगच्या तरुणीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापकासह सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, रामटेकमधील हिवरा रोडवर असलेल्या नेचर पॉईंट हॉटेल असून या हॉटेलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून देहव्यापार सुरु आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये अनेक आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढली होती. अनेक ग्राहक रात्रीच्या सुमारास यायला लागले होते. त्यामुळे अनेकांना संशय आला. दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्यामुळे हॉटेलचा व्यवस्थापक शुभम ठाकूर (रामटेक) याने दार्जिलिंगमधील काही तरुणींना देहव्यापार करण्यासाठी आपल्या हॉटेलवर आणले. त्यामध्ये २१ वर्षीय तरुणी पदवीचे शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी पैसा गोळा करण्यासाठी ती देहव्यापार करीत होती. आरोपी नरेंद्र चौधरी (बालाघाट), शुभम हारोडे (चिंचभवन, पारशिवनी), प्रेमचंद डडुरे (पारशिवनी), लोकेश रेवतकर (बोरबन) आणि आनंद सरवरे (चिचभवन) यांनी संगनमत करुन हॉटेलमध्ये तरुणींना बोलावून देहव्यापार करवून घेणे सुरु केले. हॉटेलमध्ये आलेल्या आंबटशौकीन ग्राहकांना तरुणींना पुरवत होते. लोकेश रेवतकर हा ग्राहकांसोबत तरुणींना पाठविण्यापूर्वी स्वत:ची प्रेयसी असल्याची ओळख करुन देत होता.

 

पोलिसांचा हॉटेलमध्ये छापा

हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु असल्याची माहिती पारशिवनीच्या सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांच्या नेतृत्वातील पथकाने हॉटेल नेचर पॉईंटवर बनावट ग्राहक पाठवला. त्याने तरुणीची मागणी केली. शुभम ठाकूर याने बनावट ग्राहकाकडून पैसे घेतले आणि दार्जिलिंगमधून आलेल्या तरुणीला त्याच्या रुममध्ये पाठवले. यादरम्याने, त्याने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेच छापा घातला. त्या तरुणीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तर हॉटेलचा व्यवस्थापकासह सहा जणांवर रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

 

ढाबे आणि लॉजवर देहव्यापार

 

शहरालगत आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या अनेक ढाब्यावर, हॉटेलवर आणि लॉजवर बिनधास्त देहव्यापार सुरु आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, काश्मीर, पंजाब येथील तरुणींना देहव्यापारासाठी नागपुरात आणले जात आहे. अनेक आंबटशौकिनांची गर्दी शहरालगत असलेल्या हॉटेलमध्ये वाढत आहेत. पोलिसांचे अशा देहव्यापाराच्या अड्ड्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे. अनेक हॉटेल-ढाब्यावर अनेक तरुणींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत.

About विश्व भारत

Check Also

हॉटेल में चलीं गोलियां : आरोपी गोलू कबाड़ी महाराष्ट्र से गिरफ्तार

दशहरे को होटल में चलीं गोलियां : आरोपी गोलू कबाड़ी महाराष्ट्र से गिरफ्तार   टेकचंद्र …

पुलिस ने पकड़ी 17 लाख की 350 पेटी अवैध शराब : आरोपी गिरफ्तार

पुलिस ने पकड़ी 17 लाख की 350 पेटी अवैध शराब : आरोपी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *