Breaking News

नागपूरसह १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

नववर्ष साजरा करण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि सर्वत्र गर्दी होते. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील. प्लॅटफॉर्म तिकीट विक्री १४ स्थानकांवर बंद राहणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरगी आणि लातूर या महाराष्ट्रातील स्थानकांचा समावेश आहे.

यांना मात्र सवलत…

वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने अशांना त्यातून सूट देण्यात येत आहे. वर्षअखेरीस आणि नववर्षाच्या प्रारंभी सुरळीत व सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

गुढीपाडवाच्या तोंडावर सोन्याच्या दरात वाढ… चांदीही आता…

सोने- चांदीचे दर नियंत्रणात येताना दिसत नाहीत. २४ मार्च २०२५ ते २६ मार्च २०२५ दरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *