Breaking News

वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापनाबाबत आढावा

Advertisements

मुंबई : वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी आज महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या [maharashtra forest development corporation] कामकाजाचा आढावा घेतला.                                                                                                 वनविकास महामंडळाच्या सभा कक्षात श्री.राठोड यांनी आज विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षण व वनबल व वनबलप्रमुख डॉ. सुरेश गौरोला, व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस. के. रेड्डी, मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, श्रीमती एम्तिएन्ला आओ, महाव्यवस्थापक डॉ. ऋषीकेश रंजन आदी यावेळी उपस्थित होते.                                     वनविकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने 14 वन प्रकल्प विभागाकरिता व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून त्यास केंद्र शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मंडळाच्या विविध योजनांमधून सागवान, बांबू, शिसव व इतर मिश्र प्रजातींची उत्कृष्ट रोपवने तयार करण्यात आली आहे. मंडळातर्फे एकूण 5 लाख 46 हजार 684 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय साग बियाणांची ऑनलाईन विक्री त्याचप्रमाणे इमारतीसाठी लागणारे लाकूड, जळावू लाकूड व बांबूची विक्री करण्यात येते. श्री. राठोड यांनी यावेळी वनोपज विक्री ई-लिलाव व जाहीर लिलावाद्वारे वन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 15 विक्री आगारांची माहिती घेतली.                                            वनविकास महामंडळातर्फे निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मोहुर्ली व कोलारा, नागझिरा, पिटेझरी, उमरझरी, बोर तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कोसमतोंडी येथे गृह पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत, याबाबत मंत्री श्री.राठोड यांनी समाधान व्यक्त केले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप ; कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : सीएनजीत दरवाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी …

महाराष्ट्रातही येणार चित्ता…पण कधी?वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्त्यांना पुन्हा देशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *