पाटणा: बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी पावसात वीज कोसळून [lighting] झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाला आहे़ तसेच, 32 लोक जखमी झाले आहेत. याशिवाय हानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे.
पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या 23 जिल्ह्यांमध्ये या नैसर्गिक धुमाकूळ घातला असून यात गोपालगंज, नवादा, मधुबनी, सिवान, भागलपूर, पूर्व चंपारण्य, दरभंगा, बांका, खगडिया, औरंगाबाद, पश्चिम चंपारण्य, किशनगंज, जहानाबाद, जमुई, पूर्णिया, सुपौल, बक्सर, कैमूर, समस्तीपूर, शिवहर, सारण, सीतामढी, माधोपुरा चा समावे आहे. याशिवाय उत्तरप्रदेशमध्ये देखील पावसाने कहर केला आहे. गुरुवारी राज्यात वादळी पावसात अनेक ठिकाणी वीज कोसळून 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस बिहारमध्ये जोरदार पावसाची [heavy rain] शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारे बचावकार्यात तत्पर आहेत. मी मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पीडितांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Check Also
मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती? NIA कोर्ट क्या है फैसला?
मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। मुसलमानों को …
नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य
नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली …