मुंबई : मागील 7 जूनपासून देशभरात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस येत्या सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कॉंग्रेसच्या वतीने आज राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आरोप केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, की चीनने आपल्या सैनिकांवर केलेला हल्ला काळजी करणारा आहे. आज परत बातमी आहे की चीन सैनिकांनी आपल्या भागात तंबू टाकले आहेत. पेट्रोलचे दर रोज वाढत आहेत. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की चिनी सैनिक तंबू बांधण्याचे आणि बंकर बांधण्याचे काम करत आहेत अशी माहिती आली आहे. भारतात कोणीही घुसले नसल्याचे वक्तव्य की पंतप्रधानांनी केले आहे. चीन याचाच गैरफायदा घेत आहे. इंधनदरवाढीबाबत ते म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेले 21 दिवस झाले रोज वाढत आहेत. शेतीच्या कामासाठी डिझेल वापरण्यात येते़ मात्र ते आता महाग झाले आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत असताना मोदी सरकार कर लाऊन लोकांकडून वसूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
——
Check Also
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर
राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …
ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …