चंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) व अन्य कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठी गाव पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ग्रामपंचायतींना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 828 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2020-21 मधून हा निधी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत व त्या योजनेतील बाबींची उपयुक्तता तपासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. गाव पातळीवर कोरोना संदर्भात संस्थात्मक अलगीकरण करताना व अन्य प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींना अडचण जात होती. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी गावामध्ये यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये व कोणत्याही बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला आहे. यातून देण्यात येणारा निधी केवळ कोरोना उपाय योजनासाठी खर्च करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Check Also
रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी …
नागपूरजवळील वाघासाठी अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’
जंगलात शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची चाहूल लागताच माकड किंवा हरीण यासारखे प्राणी मोठ-मोठ्याने आवाज करून …