Breaking News

ISच्या संशयित अतिरेक्याचा हल्ल्याचा कट; घरी स्फोटकांसह सुसाइड जॅकेट सापडला

Advertisements

बलरामपूर :

Advertisements

आयएस‘ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्याच्या घरावर छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये छापेमारी केली असून, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेट हस्तगत केला आहे. दिल्लीच्या धौलाकुआं येथून आयएसच्या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असं या संशयिताचे नाव असून, तो मूळचा बलरामपूरचा रहिवासी आहे.

Advertisements

अबू युसूफला दिल्लीत अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या योजना आखण्यात यशस्वी झाल्यानंतर सुसाइड बॉम्बर बनून हल्ल्याची तयारी केली होती, अशी कबुली त्याने काल दिली होती. सुसाइड बॉम्बर जॅकेट तयार केला असल्याची माहितीही त्याने दिली होती. आज केलेल्या छापेमारीत त्याचा पुरावाच अधिकाऱ्यांच्या हाती लागला. छापेमारीत मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेटही सापडला.

दिल्लीच्या धौलाकुआं परिसरातून अबू युसूफच्या मुसक्या आवळल्या होत्या. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैंसाही गावचा रहिवासी आहे. गावात त्याचे कॉस्मेटिकचे दुकान आहे. त्याचे कुटुंबीय याच गावात राहतात, अशी माहिती मिळते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

“तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही” : सरन्यायाधीश चंद्रचूड आणखी काय म्हणाले वकिलांना?

आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो, पण स्वतःला नाही. आपण आपली सचोटी कशी राखतो यावर आपला …

हिंदू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा की मणिपूर के मैतेई हिंदू समुदाय सें बैठक

नई दिल्ली स्थित मंदिर मार्गपर अखिल भारत हिन्दू महासभा के मुख्यालय हिन्दू महासभा भवन में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *