Breaking News

फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

Advertisements
गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना 
गोंडपिपरी:-
तालुक्यातील सुपगाव येथे शनिवारी  दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची शनिवारची  सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र शनिवारचा  दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला.  पाण्याने विश्रांती घेतली.
     यामुळे सर्व शेतकऱ्यांसारखेच आनंदराव हि खूप आनंदी झाला. तेथील चर्चेप्रमाणे आनंदराव ला काही दिवसापासून ताप येत होता. मात्र ना तब्बेतीची काळजी ना स्वतःची चिंता, शेतकऱ्यांसाठी एक एक दिवस महत्वाचा, आजच्या दिवसासारखा उद्याचा दिवस मिळेल हे काही सांगता येत नाही. म्हणून आज मी माझा शेतातील कापुसाचे झाडाला फवारणी करणार. अशी आनंदरावची उत्सुकता, आनंदराव हे सकाळी उठले, खाले ना खाले करून तापाच्या गोळ्या खाले व सकाळी 7 च्या सुमारास फवारणीसाठी आपल्या शेतात गेले.
         निसर्गाने मात्र वेगळेच ठरवले होते. आनंदराव चौधरी हे फवारणीसाठी सकाळीच गेले, दुपारचे 10 वाजले तरीही परत नाही आले म्हणून घरचे जेवण घेऊन शेतात गेले. तिथे बघितल तर, आनंदराव मृत्युमुखी आढळून आले. त्यांचा मृत्यू उपाशी पोटी औषध खाल्याने झाला असावा. असा अंदाज वर्तवला जात आहे. हि माहिती कळताच घरच्यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस अधिकारी मा. संदीप धोबे साहेब यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केले. आनंदराव यांना दोन मुले आहेत. अश्या प्रकारच्या घडलेल्या अचानक घटनेने गावातील गावकऱ्यांमध्ये  धक्का बसला असून सर्व गावात शोककळा पसरली आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

सद्गुरु जग्गू वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता

आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *