वेस्ट झोन मध्ये २३ वा क्रमांक
पोंभुर्णा : केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अंतर्गत पोंभुर्णा नगरपंचायत नेटवर्क उल्लेखनीय कामगिरी केलेली असून देशातील वेस्ट झोन मधून २३ व्या तर राज्यातून १७ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे.
या सर्व्हेक्षणात देशातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची स्पर्धा घेतली जाते. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान चा पुरस्कार मिळाल्याने व्हाईट हाऊस ची इमारत असलेल्या पोंभुर्णा नगरपंचायत ची ओळख संपूर्ण भारतात झालेली आहे.
पोंभुर्णा शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करून वार्डाची साफसफाई कर्मचारी मार्फतीने करून सदर कचरा डंपिंग ग्राऊंडवर जमा करतात व त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. या शहराची तपासणी एका संस्थेमार्फत केली गेली होती. सर्व्हेक्षण चार झोन मध्ये रुपांतर केले. या प्रत्येक झोनमधून १०० शहरे निवडण्यात आल्यानंतर नुकताच सर्व्हेक्षणाचा निकाल जाहीर होवून पोंभुर्णा नगरपंचायत ने वेस्ट झोन मधून २३ व्या तर राज्यातून १७ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे.
गत वर्षी पोंभुर्णा शहराने सन २०१८- १९ मध्ये वेस्ट झोन मधून सिटीझन फिडबॅक मध्ये प्रथम क्रमांक घेवून देशपातळीवर पोंभुर्णा चे नाव उंचावले होते. आता पुन्हा त्यात भर पडली आहे.
त्यात तत्कालीन मुख्याधिकारी विपीन मुद्धा तसेच विद्यमान मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सुशांत आमटे, सिटी को आर्डिनेटर महेंद्र निमजे यांनी प्रत्यक्षात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच नगराध्यक्षा श्वेताताई वनकर, उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी, नगर पंचायत चे प्रथम नगराध्यक्ष व गट नेता गजानन गोरंटीवार, नगर पंचायत गट नेते अतिक कुरेशी, नगरसेवक ईश्वर नैताम, नगरसेवक मोहन चलाख, नगरसेवक अजित मंगळगिरिवार, नगरसेवक जयपाल गेडाम, नगरसेविका सुनिता मॅकलवार, नगरसेविका सविता गेडाम तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्याने पोंभुर्णा नगरपंचायतचा देशपातळीवर पुन्हा एकदा नावलौकिक झाला आहे.