वरोरा-
डॉ. पंजाबराव देशमुख क्रुषी विद्यापीठ अकोला ,नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालीत असणाऱ्या क्रुषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अंकिता मारोती कोल्हे या क्रुषी दुतानी ग्रामीण जाग्रुकता कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकावर तंत्रशुद्ध पद्धतीने फवारणी करण्याचे मार्गदर्शन केले.
सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंदअसल्यानेक्रूषीमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील अंकिता कोल्हे या विद्यार्थीने शेतीच्या बांधावरसुद्धा सोशल डिस्टसिंग चे सर्व नियमांचे पालन करून प्रात्यक्षिक कार्यक्रम करून दाखविले.
येन्सा गावातील पाच पाच असे गट करून अंकिता कोल्हे या विद्यार्थीने या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी व त्याचे फायदे यांबाबत सविस्तर माहिती देली.सोबतच फवारणी करताना सुरक्षा कीट घालुनच फवारणी करण्याचे आवाहन केले. फवारणी करताना औषधी व पाण्याचे प्रमाण किती असावे ,फवारणी करताना कदाचीत होणारी संभाव्य विषबाधा यावर उपाय योजना याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एन.बोबडे, रावे ऊपक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.ए.खाडे यांनी क्रुषी दुताना मार्गदर्शन केले. कोल्हे यांनी राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावांतील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.फवारणी बाबत माहिती देत असताना येन्सा येथील शेतकरी वर्गानी दिलेल्यामाहितीनुसारयोग्य प्रकारे फवारणी करून शेती ऊत्पादनाची काळजी घेणार अशी मनोगते व्यक्त केली.