* भंगाराम तळोधिच्या ज्ञानशाळेत चिमुकल्यासोबत कापला केक
* शैक्षणिक साहित्याचे वितरण
* वढोलीच युवा कार्यकर्त्याने दिला दायीत्वाचा परिचय
गोंडपिपरी :-चेतन मांदाडे /प्रतिनिधी
वाढदिवस म्हणजे हल्ली दोस्त,मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत “ऐंजाॕय” करण्याचा दिवस समजला जातो.या दिवशी ना-ना विविध उपक्रम घेत जन्मदिवस साजरा करण्याची अलीकडे फॕशनच झाली आहे.असे असतांना मात्र गोंडपिपरी तालुक्यातील एका युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा उपक्रम अनेकांना प्रेरणा देऊन गेला.गोंडपिपरी तालुक्यात सद्या या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील मुळचे वढोली येथिल सुरज माडूरवार राष्ट्वादी युवक काॕग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत.नेहमीच्या भन्नाट कल्पना आणि आगड्या-वेगड्या उपक्रमाने ते सदासर्वदा सुपरिचीत असतात.अश्यातच २३ आॕगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता.नेहमी सण,वार,लग्णसमारंभ आणि जन्मदिवस आदिंच्या निमित्ताने समाजापयोगी उपक्रम राबवणारी ही व्यक्ती स्वताच्या जन्मदिवसानिमित्त करते तरी काय ? याकडे अनेकांचे लक्ष लागले.या दिवशी शुभेच्छांसाठी अनेकांचे त्यांना फोनही आले.मात्र बोलणे संपविण्यापुर्वीच आज काय उपक्रम ठेवला ? शुभेच्छुकांचा हा सवाल कायम राहिला.मात्र २३ आॕगस्ट दिवस उजाडताच ह्या युवा सामाजिक कार्यकर्त्यानी कोरोनाच्या पाश्वभुमिवर मोजक्याच सहकार्यांना सोबतीला घेत सबंध दिवस सेवेत घालविला.
वढोली गावात अभ्यासिका आहे.या गावासह परिसरातील विद्यार्थी वढोलीत अभ्यासाला येतात.यात महत्वपुर्ण पुस्तके काळजीने ठेवता यावी म्हणून माडूरवारांनी विद्यार्थ्यांना आलमारिची भेट दिली.लागलिच मोर्चा भंगाराम तळोधिकडे वळविला.ईकडे लाॕकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था केल्याने अनिकेत दुर्गेच्या “ज्ञानशाळेची” संपुर्ण राज्यभर चर्चा झाली,कौतुकही झाले.मग काय ? तालुक्यातील या महत्वपुर्ण बाबीपासून माडूरवार अनभिज्ञ कसे राहतील.माडूरवारांनी वाढदिवसाचे निमित्त साधत अनिकेतच्या ज्ञानशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली.यावेळी चिमुकल्यांना केकही भरवित आनंद साजरा केला.ऐवढेच नाही तर समाजकार्य महाविद्यालचा विद्यार्थी असलेल्या युवा अनिकेतचे कौतुक करत त्याचा सत्कार केला.आणि शुभेच्छाही दिल्या.
एकंदरित सुरज माडूरवार यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन हे उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.