गोंडपिपरी -: चेतन मांदाडे /प्रतिनिधी
स्थानिक करंजी गावातील परिसरातील येथीलच एका युवा व्यापाऱ्याने गेल्या अनेक वर्षापासून किराणा दुकानाच्या आडोशात सुगंधित तंबाखू विक्री तथा तस्करीचा गोरख धंदा चालविला असून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल केलेली आहे. व्यापार्यावर आजवर केवळ थातूरमातूर कारवाई करून सोडून दिल्याचे समजते. तर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी सदर व्यापाऱ्याचे ” अर्थपूर्ण ‘ संबंध हे यामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात असून अधिकाऱ्यांच्या मूकसंमती मुळेच सदर व्यापाऱ्याने लगतच्या तेलंगाना राज्य ते तब्बल 80 किमी अंतरावर असलेले सावली ते मूल शहरापर्यंत सुगंधित तंबाखू तस्करी चे जाळे पसरविले आहेत.
तसेच अधिकच्या लालसेपोटी गेल्या काही वर्षांपासून या व्यापार्याने चक्क किराणा व्यवसायाच्या आड सुगंधित तंबाखू विक्री व तस्करी चा गोरख धंदा चालविला आहे. याच दरम्यान काही नागरिकांच्या तक्रारीनुसार या तंबाखू व्यापार्यावर आजवर केवळ किरकोळ गुन्ह्याची नोंद करून अनेकदा गोदामात सापडलेला
सुगंधित तंबाखू चा साठा हा काही प्रमाणात जप्त करून उर्वरित साठा परतही करण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे समजते. सदर व्यापाऱ्याचे साटेलोटे स्थानिक करंजी गावापासून तर थेट जिल्हा स्तरापर्यंत असून अर्थपूर्ण कारणातून अधिकाऱ्याकडून मिळालेल्या मूकसंमती मुळे या करंजीतील युवा सुगंधित तंबाखू तस्कर व्यापाऱ्यांने प्रशासकीय नियम पायदळी तुडवून टाळेबंदी काळातही कोट्यावधी रुपयाचा सुगंधित तंबाखू विक्री व तस्करी केल्याचेही कळते. सदर युवा व्यापारी हा सुघंदीत तंबाकू तस्करीत पटाईत असून व्यापाऱ्यांची खोड मोड केल्याचेही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. सुगंधी तंबाखू विक्री व तस्करीच्या माध्यमातून या गोंडपिपरी तालुक्यातील करंजीतील युवा व्यापाऱ्याने कोट्यवधींची माया जमविलेली असून व्यवसायाला धोका ठरू पाहणाऱ्या व्यक्तींशी अतिशय नम्रपणे संबंध तर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची निकटवर्ती यता साधून इतर काही अवैद्य व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती देत त्या अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ करून देणे असा त्याचा बेत आहे. अधिकारी व अवैध व्यवसायिक यांच्यात सांगड घालून “मीडीएटर सेटर’ काही गुन्हे प्रकरणातअशी दुहेरी भूमिका ही वठवली असल्याची माहिती आहे. गावातील राजकीय मंडळी व सामाजिक कार्यकर्ता यांनाही वेळोवेळी प्रासंगिक आर्थिक मदत करून त्यांना आपलेसे करून ठेवण्यात व आपला गोरखधंदा सुरळीत सुरु ठेवण्यास अतिशय बुद्धिचातुर्याने गेल्या अनेक वर्षापासून या व्यापार्याने नव्यानव्या शक्कल लढवून आजवर सुगंधित तंबाखू विक्रीच्या गोरख धंद्यात सपेशल यश प्राप्त केले आहे. गोंडपिपरीतील करंजी परिसरातील या व्यापाऱ्याचा सुगंधी तंबाखू व विक्रीचा गोरखधंदा हा अजूनही प्रशासकीय अधिकारी तथा विशिष्ट नियंत्रण विभागाच्या का लक्षात आला नाही हा यक्षप्रश्न जनसामान्यात समोर उभा ठाकला असून, चक्क परजिल्ह्यात तंबाखूची तस्करी करणाऱ्या या ” मूर्ती लहान पण कीर्ती महान ‘ अशा अवैद्य ” मास्टर माईंड’ तस्कराला आवर घालण्याची मागणी समस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.