जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या : खबरदारी घेणे हाच उपाय
वर्धा :- गुरुवार दि.4 रोजी आज 1316 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.कोरोना रुग्णाचा सर्वात मोठा स्फोट वर्धा येथे झाला आहे. वर्धामध्ये आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 1129 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.आज आलेल्या अहवालात 168 पॉजिटिव्ह रुग्णामध्ये
1 ) वर्धा 78 ( पुरुष 29 , महिला 49 )
2 ) सेलू 16 ( पुरुष 14 , मूली 2 )
3 ) देवळी 9 ( पुरुष 5 महिला 4 )
4 ) आर्वी 6 ( परुष 2 , महिला 4 )
5 ) आष्टी 17 ( पुरुष 12 , महिला 5 )
6 ) कारंजा 4 ( पुरुष 3 , महिला 1 )
7 ) हिंगणघाट 35 ( पुरुष 22 , महिला 13 )
8 ) समुद्रपूर 3 ( महिला 3 )
एकूण 168 पुरुष 89 ( पैकी मुलं 12 ) महिला 79
( पैकी मुलं 4 ) चा समावेश आहे.तर आज 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यामध्ये (वर्धा येथील पुरुष 50 वर्षे तर हिंगणघाट येथील महिला 59 वर्षे यांचा समावेश आहे.आता यांच्यासह मृतकांची संख्या 31 वर पोहोचली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -30 तर इतर आजारामुळे 1 मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 1462 इतकी झाली आहे.तर आज 18 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात एकूण 826 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी 19706 स्त्राव नमुने पाठवण्यात आले असून यामध्ये 19692 अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये 18056 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 1462 झाली आहे.तर जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 605 रुग्ण आहे.आज आयसोलेशन मध्ये एकूण 611 व्यक्ती आहे. तर एकूण गृह विलगिकरणात 76027 व्यक्ती करण्यात आले असून आज गृहवीलगिकरणात 3223 व्यक्ती आहे.
जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे नागरिकांनी अत्यंत खबरदारी घेण्याची गरज आहे .त्यासोबतच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.सतत हात धुणे सँनिटायजर वापरणे तसेच माक्स घालणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे तसेच अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे स्वतः खबरदारी घेणेच हा उत्तम उपाय आहे.