Breaking News

वर्धा:कोरोना ब्रेकिंग:आज जिल्ह्यात 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

वर्धा :- रविवार दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 956 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 116 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात  75 पुरुष आणि 41 महिलांंचा समावेश आहेत.

वर्धा तहसीलमध्ये 45 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 5 रुग्ण आढळले असून यामध्ये 3  पुरुष तर 2 महिलेचा सामावेश आहे.तसेच आर्वीमध्ये 6 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे.तसेच आष्टीमध्ये 8 पुरुष रुग्ण आढळले असून 3 पुरुष तर 5 महिला आहे. कारंजामध्ये 5 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुषांचा समावेश आहे. तसेच हिंगणघाटमध्ये 35 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 15 महिलांचा समावेश आहे.तर समुद्रपूरमध्ये 5 रुग्ण पैकी 4 पुरुष तर 1 महिला रुग्णांचा समावेश आहे.
सध्या स्थितीत 702 ऍक्टिव्ह रुग्णांंवर उपचार सुरू आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण 753 व्यक्ती आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 1718 वर पोहचली आहे.रविवारी 98 व्यक्तिंनी कोरोनावर मात केली आहे.एकूण 984 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
आज मृत्यू 1 असून एकूण मृत्यू संख्या 32 इतकी आहे.यामध्ये कोरोनामुळे 31 मृत्यू तर इतर आजारामुळे 1 मृत्यू आहे.एकूण गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्ती संख्या 76158 असून आज गृहवीलगिकरणात 3065 व्यक्ती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने – 22012 इतके आहे.त्यामधून 21972 अहवाल प्राप्त झाले आहे.यामध्ये निगेटिव्ह संख्या 20061 इतकी आहे तर 40 अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात रोज आढळत असलेले कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

About Vishwbharat

Check Also

कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने …

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *