Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 152 नवीन कोरोना बाधित – दोन कोरोना बाधिताचा मृत्यू

🔺जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 4055 वर

चंद्रपूर(दि.७ सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 152 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 4055 वर गेली आहे. आतापर्यंत 2049 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 1958 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गोपालपुरी, बालाजी वार्ड चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर, दुसरा मृत्यु हा 54 वर्षीय बिनबा वॉर्ड, चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 4 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 6 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 48 झाली असून चंद्रपूर 44, तेलंगाना एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 89 बाधित, चिमूर तालुक्यातील 12, पोंभुर्णा तालुक्यातील 12, बल्लारपूर तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 3, भद्रावती तालुक्यातील 5, मूल तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 6, वरोरा तालुक्यातील 6, सावली तालुक्यातील 3, गोंडपिपरी तालुक्यातील 2 तसेच मुंबई 1 व वणी यवतमाळ येथील 1 असे एकूण 152 बाधित पुढे आले आहेत.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *