वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 07/09/2020 ला प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या उपस्थितीत घोषीत करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री.विपीन सुरेश पिसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस, महासचिव डाॅ. भुषणजी कर्डीले, कोषाध्यक्ष श्री. गजाननजी शेलार, श्री. अशोककाका व्यवहारे, विदर्भ प्रभारी श्री. बळवंतजी मोरघडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री. अतुलजी वांदीले, विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष श्री. सुभाषजी घाडे यांच्या प्रती आभार व्यक्त केले. तसेच विदर्भात तेली समजातील युवकाना व युवतीना तेली समाज संघटनेला संगठीत ठेवणे व बळकटी देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे यावेळी विपीन पिसे म्हणाले.
Check Also
गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …
विदर्भातील सर्व बार बंद होणार? : मद्यप्रेमींची चिंता वाढली
शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा …