Breaking News

मुंबईत येण्यापूर्वीच कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

Advertisements

…म्हणून पीसी श्रीराम यांनी चित्रपट करण्यास दिला नकार

Advertisements

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला नोटीसदेखील बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या या दणक्यानंतर कंगनाला आणखीन एक दणका बसल्याचं दिसून येत आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला एक चित्रपट करण्यास सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी नकार दिला आहे. पीसी श्रीराम यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

Advertisements

“एका चित्रपटात कंगना रणौतची मुख्य भूमिका असल्यामुळे तो चित्रपट करण्यास मी नकार दिला आहे. हा चित्रपट करत असताना मला मनातल्या मनात फार अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे माझं मत मी निर्मात्यांना सांगितलं आहे आणि त्यांनीदेखील माझ्या मताचा आदर केला आहे.जेव्हा एखादी गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हाच असं काहीसं घडतं”, असं पीसी श्रीराम म्हणाले.

Had to reject a film as it had Kangana Ranaut as the lead .Deep down i felt uneasy and explained my stand to the makers and they were understanding. Some times its only abt what feels right . Wishing them all the best.

— pcsreeramISC (@pcsreeram) September 8, 2020

दरम्यान, पीसी श्रीराम यांनी कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यात अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या लेकीचा ११ वर्षांचा संसार मोडला : ईशा देओल/भरत तख्तानी झाले विभक्त

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली …

सतत चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श : अभिनेत्री भूमी पेडणेकर

‘भीड’, ‘थॅंक यु फॉर कमिंग’, ‘द लेडी किलर’सारख्या हटके चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री भूमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *