दिनांक ११, १२,व १३ सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार रोजी राहणार जनता कर्फ्यू
भंडारा : – भंडारा शहरांमध्ये कोविड -१९ ची सातत्याने वाढ होत असल्या कारणाने पुढील काळात भंडारा शहरात कोरोना चा सामूहिक प्रसार होण्याचे नाकारता येत नाही त्या अनुषंगाने पुढील काळात कोणाचा प्रसार थांबविण्याकरिता नगराध्यक्ष तथा भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनील जी मेंढे ,उपाध्यक्ष श्री सुनील जी भुरे, नगर परिषदेतील सर्व पक्षाचे गटनेते भंडारा, व असोसिएशनचे प्रतिनिधी, माननीय आमदार विधानसभा मतदार संघ भंडारा यांच्याशी झालेल्या दूरध्वनी चर्चेनुसार भंडारा शहरात जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्नय घेण्यात आला कोरोना विषाणूचा समूह संसर्ग रोखण्यासाठी दिनांक ११, १२, १३सप्टेंबर शुक्रवार, शनिवार, रविवार ,या तीन दिवशी नगर परिषद क्षेत्रात ७२ तासाचा जनता कर्फ्यू जनतेने उत्सपृतपने पालन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले या जनता कर्फ्यू मध्ये दवाखाने औषधी दुकाने दुग्धशाळा सुरू राहतील बाहेर गाव वरून येणाऱ्या दूध विक्रेत्यांनी सकाळी ०९:००वाजेपर्यंत दूध विक्री करावे जनता कर्फ्यू हा कालावधी फक्त तीन दिवसाचा राहणार असून दिनांक १४ सप्टेंबर पासून बाजार पेटा नियमानुसार नियमित सुरू राहतील शहरातील मध्ये विक्रीचे दुकाने जनता कर्फ्यू कालावधीमध्ये बंद ठेवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांना विनंती करण्यात यावी नियमित कालावधी दररोज सायंकाळी पाच वाजेनंतर दुकाने बंद करण्याबाबत पोलीस विभाग आणि नगर परिषद यांनी संयुक्त कार्यवाही करावी सदरच्या जनता कर्फ्यू जनतेने स्वयंस्फूर्तीने यशस्वी करणेबाबत माननीय अध्यक्ष तथा भंडारा / गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे व भंडारा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आव्हान केले आहे.